मृत्यू रुग्णालयात झाल्यास आपण रुग्णालय व्यवस्थापकांना नेत्रदान करायचा मानस असल्याचे सांगू शकतो आणि ते डॉक्टर मार्फत तिथून त्याची व्यवस्था केली जाते.
पण घरात मृत्यू झाला तर खालील प्रमाणे करावे–
- १९१९ ला संपर्क करावे आणि त्यांना आपला पत्ता देऊन जवळची नेत्रपेढी चा नंबर घ्यावा आणि त्यांना सुचित करावे
- मृतकाच्या पापण्या बंद कराव्यात
- मृतदेह ठेवलेल्या खोलीतील पंखे बंद करणे असेल तर ए सी लावणे
- मृतकाचा डोक्याचा भाग चार पाच उश्या ठेऊन उंच ठेवणे.
- कोर्निया वाळू नये म्हणून डोळ्यावर सलाईनमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत
- जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून डोळ्यात एन्टीबायोटिक चे थेंब थोड्या- थोड्या वेळात टाकत रहावेत.
या प्रकारे आपण नेत्रदान प्रक्रिया सहज पार पडू शकतो.

Ex-Prof. Department of Community Medicine, Seth. GSMC & KEM Hospital